महास्वयंम रोजगार पोर्टल-बेरोजगारांसाठी नोकरीची संधी

महास्वयंम रोजगार पोर्टल-बेरोजगारांसाठी नोकरीची संधी


महास्वयम एम्प्लॉयमेंट रोजगार नोंदणी | एम्प्लॉयमेंट Maharashtra Mahaswayam Employment Registration 2020 | mahaswayam.in Employment Registration & Login | Maharojgar Employment Login & Registration | Employment Registration Online In Maharashtra | Mahaswayam Job-Seekers Registration

   नमस्कार मित्रांनो, Marathi Helpers वर आपले स्वागत आहे. या पोस्टमध्ये आपण महास्वयं रोजगार पोर्टलविषयी  पुर्ण माहीती जाणून घेणार आहोत . चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती....

     महास्वयंम रोजगार पोर्टलविषयी थोडक्यात सांगायचे म्हटले तर हे वेबपोर्टल महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने  तयार केले आहे. या पोर्टलवर इच्छुक उमेदवार  रजिस्ट्रेशन करू शकतात. 

   बेरोजगार उमेदवारांना रोजगार शोधण्यासाठी, हे वेबपोर्टल उपयोगी ठरणार आहे. आता आपण बघुया महास्वयंम रोजगार  वेबपोर्टल रोजगार शोधण्यासाठी कसे उपयोगी ठरणार आहे? 


महास्वयंम रोजगार पोर्टल


  कौशल्य विकास विभागाच्या महारोजगार, एमएसएसडीएस व महास्वयंरोजगार या तिन्हीं वेबपोर्टलचे एकत्रिकरण करून महास्वयंम हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे.

      महास्वयंम रोजगार या वेबपोर्टलवर अनेक संस्था आणि कंपन्यांमध्ये रिक्त असणार्‍या पदांची जाहीराती दिलेल्या असतात. हे वेबपोर्टल महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगारासंबधित माहीती देण्यासाठी तयार केले आहे.
     
  आपल्या महाराष्ट्रातील बरेचसे लोक असे आहेत त्यांना रोजगाराची गरज आहे. अशा या इच्छुक उमेदवारांसाठी रोजगार शोधण्यासाठी, हे वेबपोर्टल उपयोगी ठरणार आहे. 
  
   या पोर्टलवर विविध संस्थामध्ये असणार्‍या नोकरीची सुचना आहे. या पोर्टलवर अनेक संस्था आणि कंपन्यांमध्ये असणार्‍या रिक्त पदांच्या जाहीरात दिलेल्या आहे. त्यामुळे या वेबपोर्टलच्या मदतीने रोजगार मिळणे शक्य झाले आहे.

     या पोर्टलवर कोणताही इच्छुक उमेदवार रजिस्ट्रेशन करू शकतो आणि रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतो. इच्छुक उमेदवारांनी ‘महास्वयंम’ वेबपोर्टलचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाने केले आहे.

महास्वयंम रोजगार पोर्टलचे उद्दिष्ट


    तुम्हाला तर माहितीच असेल,आपल्या महाराष्ट्र राज्यात असे अनेक लोक आहेत जे सुशिक्षित असूनही बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार मिळत नाही. या कारणास्तव ते आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, या सर्व अडचणी लक्षात घेता, राज्य सरकारने या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महास्वयंम रोजगार  पोर्टल सुरू केले आहे. 

    हे पोर्टल रोजगार उपलब्ध करुन आत्मनिर्भर बनविण्यासाठी हे वेबपोर्टल महत्त्वाचे ठरत आहे. महास्वयंम रोजगार योजनेच्या माध्यमातून  2022 पर्यंत 4.5 कोटी कार्यकुशल तरूणांची निर्मिती केली जाणार आहे.


 महास्वयंम रोजगार पोर्टलवर कोण अर्ज करु शकतात?

 • 14 वर्षे व त्यावरील इच्छुक उमेदवार या पोर्टलवर अर्ज करु शकतात.
 • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

महास्वयंम रोजगार पोर्टलचे फायदे

 • महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि इच्छुक उमेदवार या पोर्टलवर नोंदणी करून कोणत्याही प्रकारच्या नोकरीविषयी तसेच ट्रेनिंग आणि रोजगारासंबधित माहीती मिळवू शकतात.
 • या पोर्टलवर नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.
 • या पोर्टलवर विविध संस्था आणि कंपन्यां येथे रिक्त पदांच्या जाहीरात देऊ शकतात.

कागदपत्रे

 • आधार कार्ड 
 • शैक्षणिक प्रमाणपत्र 
 • कौशल्य प्रमाणपत्र 
 • अनुभव प्रमाणपत्र 
 • ई-मेल 
 • मोबाइल  क्रमांक

महास्वयंम रोजगार पोर्टल वर नोंदणी कशी कराल? 

       या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी खालीलप्रमाणे फॉलो करा :

 • सर्व प्रथम, अर्जदारास  महास्वयंमच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल.
 • तुम्ही जर मोबाइलवरून नोंदणी करत असाल तर Desktop mode चालू करा.
 • अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
 • या मुख्यपृष्ठावर आपल्याला "रोजगार विनिमय" हा पर्याय दिसेल. आपल्याला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. 
 • ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्यासमोर उघडेल.
 • त्या पेजवर नोंदणी हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. नोंदणी करण्याचे पेेेज ओपन होईल.
 • या पेजवर आधारकार्डप्रमाणे तुमची माहीती भरा.
 • पुर्ण माहीती भरल्यानंतर Next वर क्लिक करा.
 • तुम्हाला मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल.
 • पुढील पेजवर OTP सबमिट करा.
 • OTP सबमिट केल्यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल. या पेजवर इतर काही मागीतलेली माहिती भरा.
 • Passwords set करुन creat account वर क्लिक करा.
 • तुमची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही लॉग इन करु शकता. 


महास्वयंम रोजगार पोर्टलवर नोकरी कशी शोधावी ?

  रोजगार शोधण्यासाठी आपल्याला कोणत्या जिल्ह्यात काम करायचे आहे त्यानुसार जिल्हा निवडणून तुम्ही रोजगार शोधू शकता.

 रोजगार शोधण्यासाठी येथे क्लिक करा.


    
    महास्वयंम रोजगार पोर्टल विषयी तुमच्या काही समस्या असतील तर कॉमेंट करा. ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आमची पोस्ट आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. 

   या ब्लॉग पोस्टशी संबंधित कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारण्यासाठी खाली कॉमेंट्स करा. तुम्ही आमच्या फेसबुक पेजवरील मेसेज बॉक्समध्ये तुमच्या समस्या पाठवू शकता. आमच्या फेसबुक पेजवर जाण्यासाठी येथे क्लिक करा..

You may like these posts